मुंबई: महाराष्ट्रात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (Wine Sale) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे. तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Government) या निर्णयानंतर आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
भाजप नेते व माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राज्य सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. कष्टकऱ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी या सरकारला वेळ नाही. राजकारण करणे आणि दारुवाल्यांना प्रोत्साहन देणे, हे काम सरकार करत आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. दारुवर जो ३०० टक्के कर होता तो १५० टक्क्यांवर आणला. वीज स्वस्त असण्याचं कारण नाही, घरात अंधार असला तरी चालेल. यातून शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही, उलट वाईन उद्योजकांनाच त्याचा फायदा होणार आहे, असंही सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मस्त पियो, खुब जियो हा या सरकारचा मंत्र आहे. हे सरकार पूर्णपणे बेवड्यांना समर्पित आहे. कोरोनात सर्वसामान्यांना औषधांची गरज आहे. पण आम्ही दवा नही दाऊ देंगे, असं हे सरकार आहे. वाईन उद्योजक जे आहेत मी नाव घेणार नाही पण एका कंपनीचे बटिक आहेत. त्या कंपनीचं मी नाव घेणार नाही, पण त्या कंपनीची पोहोच एवढी आहे मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ती कंपनी स्वत:ला साजेसे निर्णय घेऊ शकते’, असा गौप्यस्फोट मुनगंटीवार यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:

