🕒 1 min read
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या सदस्या विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चव्हाण, त्यांचे पती अभिजित, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी शीतल यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच या प्रकरणावरून भाजपने सत्ताधारी पक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना सवाल विचारला आहे .
खासदार @supriya_sule ताई आणि महिला व बाल विकास मंत्री @AdvYashomatiINC ताई,
सुनेचा छळ करणाऱ्या तुमच्या सहकारी विद्या चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात तुम्ही भूमिका घेणार की नाही ? pic.twitter.com/D1wy1cpdRZ— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 3, 2020
भाजपनं केलेल्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे व यशोमती ठाकूर यांना टॅग करण्यात आलं आहे. सुनेचा छळ करणाऱ्या तुमच्या सहकारी विद्या चव्हाण व त्यांच्या कुटुंबाविरोधात तुम्ही भूमिका घेणार का, असा सवाल भाजपनं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना केला आहे.
विद्या चव्हाणांनी सुनेचे आरोप फेटाळले
‘माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध आहेत. हे कळल्यानंतर माझ्या मुलानं घटस्फोट घेण्याची तयारी सुरू करताच सुनेनं आरोप केले आहेत. कुणाच्या तरी चुकीच्या सल्ल्यामुळं ती असं वागत असून न्यायालयात खरंखोटं सिद्ध होईल,’ असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. नवरा-बायकोच्या वादात मला ओढण्यात आलं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

