नवी दिल्ली : विराट कोहलीकडून (Virat Kohli) एकदिवसीय कर्णधारपद काढून घेतल्यानंतर विराट नाराज असल्याचे म्हंटले जात होते. तसेच विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेपूर्वीच्या सराव सत्रात देखील सामील नव्हता. त्यामुळे विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत सहभागी होणार नाही अशी चर्चा सर्वत्र सुरु होती.
दरम्यान, आता बिसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर विराट कोहली तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत खेळणार असल्याची पुष्टी केली आहे. एका वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार मंडळाच्या काही सूत्रांनी आणि अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. विराट कोहलीला एकदिवसीय मालिकेतून वगळण्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तीन सामन्यांची वनडे मालिका १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. बीसीसीआयच्या सदस्याचे म्हणणे आहे की, विराट कोहलीने एकदिवसीय मालिका वगळल्याच्या वृत्तात तथ्य नाही. तो पूर्णपणे समर्पित क्रिकेटपटू आहे आणि त्याच्या खेळण्याबद्दल कोणतीही शंका नाही.
बीसीसीआय किंवा निवड समितीच्या कोणत्याही सदस्याने कोहलीशी संपर्क साधला आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही, परंतु बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत आहेत. या दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने मीडिया कॉन्फरन्सचे नियोजन केल्यामुळे बुधवारी कोहलीकडून स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे. त्यावेळी यावर परिस्थिती अधिक स्पष्ट होईल.
दरम्यान, रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून आपली भूमिका पार पाडू शकेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सूत्रांनी सांगितले की, रोहित शर्मावर बीसीसीआयचे फिजिओ लक्ष ठेवून आहेत. अलीकडेच मुंबईतील प्रशिक्षणादरम्यान ‘लेफ्ट हॅमस्ट्रिंग’ दुखापतीमुळे त्याला कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. मात्र, वनडे मालिकेत अजून बराच वेळ शिल्लक आहे. तोपर्यंत रोहित फिट होतो की नाही हे पाहावे लागेल. त्याची एक्झिटही भारतीय संघासाठी मोठा झटका म्हणता येईल. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळताना इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली होती.
महत्वाच्या बातम्या
- ”त्या’ विद्यार्थ्याला आत्महत्येस भाग पाडणाऱ्या खुनी सरकारवर ३०२ दाखल करा’
- ‘…चे श्रेय काशीचे खासदार असलेले पंतप्रधान मोदी यांनाच द्यावे लागेल’, शिवसेनेकडून मोदींचे कौतुक
- ‘ज्या गंगेच्या पात्रात मोदींनी डुबकी मारली त्याच गंगेत हजारो बेवारस प्रेते वाहताना जगाने पाहिले’
- ‘सचिन वाझे, मुकेश अंबानी अन मुख्यमंत्री’… काय म्हणाले राज ठाकरे..?
- 2 दिवस उशिरा का होईना पवार साहेबांना बड्डे गिफ्ट मिळालं; राणेंचा खोचक टोला


