मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्याची घोषणा केली अन् त्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल 2020) 13व्या मोसमाचा मार्ग मोकळा झाला. आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये खेळवला जाणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी माहिती दिली. आत यंदाच्या IPL स्पर्धेत ‘वर्क फ्रॉम होम’ असेल म्हणजे घरातून कॉमेंट्री करण्याचा पर्याय खुला करून देणार असल्याची चर्चा आहे. असे वृत्त लोकसत्ताने दिले आहे.
‘व्हर्च्युअल कॉमेंट्री’ म्हणजेच सामना एका ठिकाणी तर समालोचन विविध ठिकाणांहून अशी नवी कल्पना IPLसाठी राबवण्यात येण्याची शक्यता आहे. नुकतीच दक्षिण आफ्रिकेत टी३ सॉलिडारिटी कप स्पर्धा झाली. या स्पर्धेतील एकमेव सामन्यात तीन संघ एकमेकांविरूद्ध खेळले आणि त्यात एबी डीव्हिलियर्सचा संघ विजेता ठरला. या स्पर्धेचे प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्ट्सकडे होते. त्यामुळे आफ्रिकेतील सेंच्युरियन पार्कवर सुरू असलेल्या सामन्याचं धावतं समालोचन चक्क भारतातील तीन समालोचकांनी केले.
यासंदर्भात इरफानने आफ्रिकेतील सामन्याबाबतचा फोटो देखील ट्विट केला होता. आफ्रिकेतील या सामन्यासाठी इरफान पठाणने बडोद्याच्या घरून, दीप दासगुप्ता याने कोलकाताच्या घरून आणि संजय मांजरेकर यांनी मुंबईच्या घरून एकत्र धावतं समालोचन केले. केवळ समालोचकच नव्हे, तर सर्व क्रु मेंबर्स (सहाय्यक कर्मचारी) यांनीही देशाच्या विविध भागातून लॉग इन करत काम केले. तर संपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे प्रमुख हे मैसून येथून वर्क फ्रॉम होम करत होते.
My new commentary box:). #Newnormal #commentry #covidera pic.twitter.com/5bIkg8hFa1
— Irfan Pathan (@IrfanPathan) July 18, 2020
३६ षटकांच्या आफ्रिकेतील सामन्यासाठी जसं समालोचन करण्यात आलं तीच पद्धत यंदाच्या IPLसाठी वापरण्याचा विचार ब्रॉडकास्टर करत आहेत. दरम्यान, सुरूवातीच्या काळात हिंदी आणि इंग्रजी कॉमेंट्रीसाठी जर असं शक्य झालं नाही, तर स्थानिक भाषांमध्ये करण्यात येणाऱ्या समालोचनासाठी ही संकल्पना राबवली जाऊ शकते.
रिलायन्स साठी घाईघाई , दूरदर्शनसाठी दिरंगाई मागची गोम काय ?
आता परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी धावून आला सोनू सूद; खास विमानाची केली सोय
सोनू सूदचा पुन्हा एकदा मदतीचा हात, नोकरी शोधण्यासाठी लाँच केलं अॅप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

