मुंबई : देशासह अनेक राज्यातील शहरांमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला करोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. राज्यातील अनेक शहर व जिल्हे पुन्हा लॉकडाऊनमध्ये जात आहेत. या लॉकडाउनच्या काळात अभिनेता सोनू सूद देशातील प्रवासी मजुरांची मदत करत आहे. महाराष्ट्रातील विविध मजुरांना त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये सुखरूप पोहोचवल्यानंतर अभिनेत्याने आणखी एक चांगले काम केले आहे. प्रवासी मजुरांना नवीन काम मिळावे याकरता सोनूने जॉब हंट अॅप लाँच केले आहे. ‘प्रवासी रोजगार’ असं या अॅपचं नाव आहे. हे अॅप प्रवासी कामगारांना नोकरी शोधण्यासाठी सर्व आवश्यक माहिती देईल.
न्युज १८ लोकमतने यासंदर्भात माहिती दिली कि, सोनू सूद गेल्या काही महिन्यांपासून हे अॅप डिझायन करण्याचा विचार केला होता. त्यानंतर योजना आखून तयारी करण्यात आली. यासंदर्भात अव्वल संस्थांशी व्यापक चर्चा झाली आहे. स्वयंसेवी संस्था, परोपकारी संस्था, सरकारी अधिकारी, रणनीती सल्लागार, तंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि सर्व प्रवाशांना ज्यांना त्यांच्या घरी पोहोचवले त्या सर्वांशी चर्चा झाली असल्याचं तो म्हणाला.
— sonu sood (@SonuSood) July 22, 2020
विविध क्षेत्रांतील सुमारे 500 कंपन्या या पोर्टलवर बांधकाम, परिधान, आरोग्य, अभियांत्रिकी, बीपीओ, सुरक्षा, वाहन, ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक इत्यादी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देतील. तसेच हे अॅप कामगारांना काही मूलभूत प्रशिक्षणासह इंग्रजी कसे बोलायचे ते देखील शिकवेल. सध्या इंग्रजीमध्ये असणारे हे APP लवकरच 5 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे कामगारांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यास काही गोष्टी सुखकर होतील. हे अॅप विनाशुल्क आहे.
१ लाख नागरिकांकडून ‘आरोग्य सेतू’ ॲप डाऊनलोड
टिकटॉकवर बंदी; ‘या’ प्रसिद्ध कलाकारांनी केले सरकारच्या निर्णयाचे तोंडभरून कौतुक
स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं, सोनू सूदचं मराठीमध्ये ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

