Share

‘तिसरी लाट येणार का? हे सांगण्यासाठी मी उद्धवजींसारखा डॉक्टर आणि संजय राऊतांसारखा कंपाउंडर नाही’

Published On: 

जालना : भाजप आणि शिवसेना यांच्यामधील राजकीय घमासान दिवसेंदिवस वाढतच चालत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष जालना येथे दौर्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

भाजपा कार्यकर्ते जगदीश सिद्ध यांच्या धावणी मोहल्ला येथील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, ‘तिसरी लाट येणारच नाही असं भाकीत करण्यासाठी मी उद्धवजींसारखा डॉक्टर किंवा कंपाउंडर नाही म्हणजे, उद्धवजी सरकार डॉक्टर आणि संजय राऊत यांच्या सारखा कंपाऊंडर नाही.’ असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे.

याबरोबरच तिसरी लाट, ती येऊ पण शकते. कोरोना फक्त उद्धवजींशी बोलतो. आता दुसरी लाट बऱ्यापैकी आवाक्यात आली आहे .त्यामुळे जनजीवन सुरू करण्याशिवाय आता पर्याय नाही असे स्पष्ट मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याचं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं.

पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. ‘आम्ही समोरून कोथळा काढतो. पाठीत खंजीर खुपसत नाही. आम्ही शिवाजी महाराजांची औलाद आहोत. अफजल खानाचा कोथळा पुढून काढलेला आहे. जो कोणी असेल तो. शाहिस्ते खानाची बोटं समोरून तोडली आहेत. पाठीमागून वार करण्याची परंपरा शिवसेनेची नाही.

बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हे घाणेरडं काम कधी शिकवलं नाही. काय असेल ते समोरून. पाठीत खंजीर खुपसण्याची परंपरा शिवसेनेची नाही, असं सांगतानाच पाठीत खंजीर आमच्या खुपसलेला आहे. शब्द आम्ही नाही फिरवला नाही. शब्द तुम्ही फिरवला आहे.’ असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!