Share

संभाजीनगर नामांतरासंदर्भात ‘शिवसेना’ अजून काहीही बोललेली नाही- जयंत पाटील

Published On: 

औरंगाबाद : महानगर पालिका निवडणुका जस-जशा जवळ येत आहेत, तशी पुन्हा एकदा औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरुन चर्चा सुरू झाल्या आहेत. यात ‘हीच ती वेळ’ असल्याचे सांगत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही याला होकार असल्याचे म्हटले होते. मात्र, शिवसेनेच्या वतीने असा कोणताच प्रस्ताव आपल्याकडे आला नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

औरंगाबद शहराचे नामांतर शिवसेनाप्रमुखांनी खुप आधीच केले आहे. आता केवळ कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करायची बाकी असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले होते. त्याच बरोबर या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचाही पाठिंबा असल्याचे म्हटलं होतं. जयंत पाटील यांनी मात्र, हा दावा स्पष्ट शब्दात फेटाळला आहे. असा कोणताच प्रस्ताव शिवसेनेच्या वतीने आमच्याकडे आलाच नसल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या आधीच संभाजीनगरचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीमध्ये चर्चिला जातो. यावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमीका अद्याप स्पष्ट झालेली नाही. काँग्रेसचे स्थानिक नेते मात्र, आमचा नामांतरला विरोध असल्याचे स्पष्ट सांगत आहेत. आता या मुद्यावरुन मनपा निवडणुकीत पुन्हा एकदा चर्चा होणार असेच सध्या चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!