Share

यंदाचा पालखी सोहळा होणार का ? बैठक संपली ; अजित पवारांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण

Published On: 

पुणे : राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत त्यामुळे राज्यात कडक निर्बंधांसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गर्दी होऊ नये व त्यातून रुग्णसंख्या वाढू नये या साठी मंदिरे देखील बंद ठेवण्यात आले. संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याला गेली अनेक वर्ष्यांपासूनची परंपरा आहे मात्र मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा पालखी सोहळा रद्द करण्यात आला होता. तर यंदाच्या पालखी सोहळ्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर आज पालखी सोहळ्याच्या मान्यवरांना आषाढी वारी संदर्भात बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. बहुतेकांचा आग्रह आहे की कमीत कमी लोकांमध्ये वारी काढतो, आम्हाला परवानगी द्या. पण मुख्यमंत्र्यांच्या कानावर या भावना पुढच्या कॅबिनेटमध्ये घालणार असून त्यातच वारी बाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे नियोजन कण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी (दि.28) रोजी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अजित पवार बोलत होते. पवार म्हणाले, ‘पायी वारीची मागणीचा आग्रह वारकरी संप्रदायाकडून धरला जात आहे. पण राज्यात आजही असे १८ जिल्हे आहेत जिथे कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. त्यात ती साताऱ्यात जास्त आहे. त्यांचे म्हणणे की आम्ही इतरांना येऊ देणार नाही. वारकरी संप्रदाय जे म्हणतो ते करतो. पण वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.

सध्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची परिस्थिती गंभीर आहे. लॉकडाऊन लावण्यात किंवा पालखी सोहळा बंद ठेवण्याची आम्हाला हौस नाही. पण दुसरा पर्याय उपलब्ध नाही. ग्रामीण भागातील हावसे गवसे यांची संख्या मोठी असते. तसेच पालखी सोहळ्यादरम्यान रोज टेस्टिंग केले आणि तरी कोरोनासंख्या आढळली तर पालखी थांबवता येणार नाही. त्यामुळे काय तो योग्य निर्णय आपल्याला घ्यावा लागेल.’ असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!