Share

महाशिवआघाडीचे भवितव्य दिल्लीत ठरणार ? शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : महाशिवआघाडीच्या संदर्भातील मोठी बैठक दिल्ली येथे होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार हे कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत शिवसेनेच्या पाठींब्याबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या दोन बड्या नेत्यांच्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यातील सत्ता संघर्षाचा पेच अजूनही सुटलेला नाही. या संघर्षातून भाजप जरी बाजूला पडले असले तरी शिवसेना , राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरु आहेत. शिवसेनाल पाठींबा देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस तयार आहे, मात्र कॉंग्रेस काहीशी कचरत असल्याच दिसत आहे. त्यामुळे शरद पवार आज सोनिया गांधींची भेट घेऊन शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत चर्चा करणार आहेत, असे समजते.

दरम्यान आतापर्यंत झालेल्या तिन्ही पक्षांच्या बैठकीत मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल, असे निश्चित झाले आहे. तर उपमुख्यमंत्री पद हे कॉंग्रेसच्या गोटात देणार असल्याचं सूत्रांनी सांगितल आहे. तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांचे खातेवाटपावर जवळपास एकमत झाले असून, ५ वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच राहणार असून, सेनेला १६, राष्ट्रवादी १४ तर कॉँग्रेसला १२ मंत्रिपदे मिळतील, अशी ही माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1195549093822468096?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195546596772995072?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1195545638269673473?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!