Share

तेजस ठाकरेंची व्यासपीठावर हजेरी, राजकारणात सक्रीय होणार ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच नेतेमंडळी व्यस्त आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी आज संगमनेरमध्ये सभा घेतली. या सभेला जिल्ह्यातील महत्वाचे नेते उपस्थित होते.

महायुतीच्या या सभेला उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांनी ही उपस्थिती लावली. त्यामुळे सगळ्यांच्या नजर या तेजस ठाकरे यांच्याकडे वळल्या. तेजस ठाकरे हे अजून राजकारणात सक्रीय झालेले नाही. परंतु ते आता प्रचारात उद्धव यांच्यासोबत फिरताना पाहून त्यांची लवकरचं राजकारणात अधिकृत एन्ट्री होऊ शकते.

उद्धव ठाकरे यांचे थोरले चिरंजीव आणि युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आधीपासूनच राजकारणात सक्रीय आहेत. तसेच आदित्य हे मुंबईतील वरळीमधून निवडणूकही लढवत आहेत. त्यामुळे आदित्य यांच्याप्रमाणे तेजस हेही राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चांना उधान आले आहे.

दरम्यान, संगमनेर येथील सभेला भाजप आणि शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. त्यात राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे, तेजस ठाकरे यांचासह महायुतीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1181856719606992897?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181856152293761024?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181852684791402496?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!