धर्मशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १५ मार्च रोजी होणारा तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लखनभ येथे खेळवण्यात येणार आहे. आता हा सामना प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवण्यात येणाऱ्या मालिकेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिकेत १५ मार्च रोजी लखनऊमध्ये होणारा दुसरा आणि १८ मार्च रोजी कोलकत्तामध्ये होणारा तिसरा एकदिवसीय सामना प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार आहे.
कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला असून आयोजकांनी विकण्यात आलेल्या तिकीटांचे पैसेही प्रेक्षकांना परत करण्याचा विचार केला आहे.आतापर्यंत या सामन्याचे ५ कोटी रूपयांचे तिकीट विकण्यात आले आहेत. पण आता हे तिकीटांचे पैसे प्रेक्षकांना परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मालिकेतील शेवटचा सामना १८ मार्च रोजी कोलकत्ता येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या विकण्यात आलेल्या सर्व तिकिटांचे पैसे प्रेक्षकांना परत करण्यात येणार आहेत. याआधी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पार पडलेला मालिकेतील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे टॉस न करताच रद्द करण्यात आला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

