Share

संभाजीराजे तलवारीचा वापर OBC वर करणार का अजून कोणावर? छगन भुजबळांचा संभाजीराजेंना सवाल

Published On: 

मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात विविध आंदोलनं मराठा समाजातर्फे करण्यात येत असून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला काल तुळजापूरातून सुरुवात करण्यात आली आहे. भवानी आईच्या दारात जागरण-गोंधळ करून आरक्षणासाठीच्या लढ्यासाठी आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. यावेळी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सरकारला आक्रमक इशारा दिला असून त्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खोचक सवाल केला आहे.

छगन भुजबळ यांनी, ‘राजे सर्व जनतेचे असतात, रयतेचे असतात, एका समाजाचे नाही. सर्व समाजाचा विचार राजांनी करावा. आता संभाजीराजे तलवारीचा वापर OBC वर करतात का अजून कोणावर करतात ते बघावं लागेल,’ अशी प्रतिक्रिया देत खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.यासंदर्भात न्यूज १८ लोकमतने वृत्त दिलं आहे. तर, छगन भुजबळ यांनी MPSC परीक्षा पुढे ढकलण्यावर देखील नाराजी व्यक्त केली होती.

गरज पडेल तेव्हा तलवारी काढू!

‘1902 मध्ये शाहू महाराजांनी प्रथम आरक्षण दिले त्यात मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होणे गरजेचं आहे. 80 टक्के मराठा समाज गरीब आहे. आम्ही भीक मागत नाही हक्काचे आरक्षण मागतो. आम्हाला आता गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका. माझ्या रक्तात शिवाजी महाराज आणि शाहू महाराज आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार,’ असं संभाजीराजे म्हणाले होते. तसेच गरज पडल्यास तलवारी काढू असा आक्रमक इशारा देखील त्यांनी दिला होता.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!