Share

IPL 2022 PBKS vs CSK : ६ वर्षानंतर आयपीएल खेळणाऱ्या ऋषी धवननं का लावली होती face shield? वाचा कारण!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये वानखेडे मैदानावर पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज (PBKS vs CSK) यांच्यात सामना रंगला. या सामन्यात पंजाबकडून ऋषी धवनला संधी मिळाली. तब्बल ६ वर्षांनंतर ऋषी धवन आयपीएल खेळतो आहे. चेन्नईविरुद्ध ऋषी धवन पाचवे षटक टाकायला आला. त्याला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले, कारण त्याने फेस-शील्ड (face shield) लावली होती. डोक्याला संरक्षण देणारी ही शील्ड होती. पण त्याने ती का लावली याचे कारण समोर आले आहे.

ऋषी धवनने चेन्नईविरुद्ध फेस-शील्ड लावून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, कारण रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान त्याच्या डोक्याला मार लागला. भविष्यात अशी गोष्ट टाळण्यासाठी ऋषी धवनने फेस-शील्ड वापरण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोणत्याही फलंदाजाला किंवा नियमांचे नुकसान होत नाही, कारण खेळाडू अनेकदा असे करतात.

ऋषी धवनने  फेस-शील्ड वापरण्याचे आणखी एक कारण म्हणजे गोलंदाजी करताना तो अर्ध्या खेळपट्टीपर्यंत पोहोचतो. अशा परिस्थितीत चेंडूचा मार बसण्याची शक्यता जास्त असते आणि ते टाळण्यासाठी त्याने ही शील्ड वापरण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात धवनने २ बळी घेतले.

असा रंगला सामना…

सलामीवीर शिखर धवनच्या शानदार खेळीनंतरच्या तगड्या गोलंदाजीमुळे पंजाबने हा सामना जिंकला. या हंगामातील ३८व्या सामन्यात पंजाब किंग्जने २० षटकात ४ गडी गमावून १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जला ६ विकेट्सवर १७६ धावाच करता आल्या. पंजाबकडून धवनने ८८ धावांची नाबाद खेळी खेळली आणि भानुका राजपक्षेसोबत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. त्याचबरोबर कगिसो रबाडा आणि ऋषी धवन या वेगवान गोलंदाजांनी २-२ तर संदीप शर्मा, अर्शदीप सिंग यांनी १-१बळी घेतला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!