Share

सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या कोर्टात आजपासून जाणार नाही : कपिल सिब्बल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर कॉंग्रेसनेते अधिकच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. सरन्यायाधीशांविरोधात सिब्बल यांच्यासह ६३ अन्य खासदारांनी महाभियोग आणण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टात वकिली करणारे ज्येष्ठ विधीज्ञ आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी आजपासून मिश्रांच्या कोर्टात जाणार नाही, अशी घोषणाच त्यांनी केली. ते इंडियन एक्स्प्रेसशी ते बोलत होते.

काय म्हणाले कपिल सिब्बल?
“नोटिसीवर निकाल देण्यासाठी सभापतींकडे न्यायिक अधिकार नसतात. तर न्यायाधीशांच्या माध्यमांतून स्थापित समितीकडे यावर कारवाईचा अधिकार असतो. त्यानुसार, राज्यसभा सभापती नोटीशीवर निर्णय देऊ शकत नाहीत. ते केवळ महाभियोगाच्या प्रक्रियेवर निर्णय देऊ शकतात. राज्यसभा सभापतींकडे नोटिस फेटाळण्याचा कोणताही अधिकार नाही.जोपर्यंत सरन्यायाधीश निवृत्त होत नाहीत, तोपर्यंत मी उद्यापासून त्यांच्या कोर्टात जाणार नाही. माझ्या व्यवसायाच्या मुल्यांशी अनुरुप हा माझा निर्णय आहे”.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!