Share

१५ डिसेंबरनंतरच मुंबई लोकल सामान्यांसाठी सुरु होणार? इकबाल चहल यांचं सूचक विधान

Published On: 

मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलची सेवा देखील या काळात बंद करण्यात आली होती. जूनमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन उठवल्यानंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली होती.

यानंतर, राज्य सरकारने महत्वाचं पाऊल उचलत सामान्य महिलांसाठी लोकलचा प्रवास सुरू करून नवरात्रोत्सवाची भेट दिली. मात्र, लोकलने प्रवास करण्याच्या वेळेची मुभा फारशी उपयोगी नसल्याची प्रतिक्रिया अनेक महिलांनी दिली होती. तर, सर्वांसाठी लोकलसेवा सुरु करण्यासाठी ही एक प्रकारची चाचणी असल्याचे बोललले जाऊ लागले होते.

दिवाळीनंतर राज्य सरकार मुंबईकरांना दिलासा देऊ शकते अशी शक्यता होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट व वाढती रुग्णसंख्या यामुळे लोकलसेवेसाठी सामान्यांना प्रतीक्षा पाहावी लागणार असल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एबीपी माझा या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे.

येणारे दोन आठवडे मुंबईकरांसाठी महत्वाचे आहेत, दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ञांनी वर्तवल्यामुळे येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची स्थिती महत्वपूर्ण असणार आहे. याकाळात स्थिती नियंत्रणात राहण्याची गरज असून १५ डिसेंबरपर्यंत आढावा घेतला जाईल. त्यामुळे, १५ डिसेंबरनंतरच लोकल सुरु होण्याची अपेक्षा असून सामान्य मुंबईकरांची प्रतीक्षा लांबली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!