ठाणे : मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापेमारी केल्यानंतर त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ठाण्यातून ताब्यात घेतले असून, त्यांना सोबत घेऊन गेले आहेत. त्यांना कार्यालयात नेऊन चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, सरनाईक यांच्या कुटुंबीयांचे ठाण्यातच एक घर आहे. तेथे विहंग यांना ईडीचे पथक घेऊन गेल्याचे कळते.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना आज प्रताप सरनाईक त्यांच्या घरी नाही आहेत. त्यांची मुले घरी आहेत. हे पाहून त्यांनी जी धाड टाकली ही नामर्दांगी आहे. भाजपने सरळ लढाई करावी. हे शिखंडीसारखे यंत्रणांच्या आडून कारवाई करू नका असं सुनावले.
"प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली,यात कसली मर्दानगी",असं म्हणणाऱ्या @rautsanjay61यांना विचारलं पाहिजे,एक महिला घरी नसताना…सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं, यात कोणती मर्दानगी होती?@BJP4Maharashtra @TV9Marathi @abpmajhatv @TheMahaMTB
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) November 24, 2020
राऊत यांनी भाजपवर टीका केल्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “प्रताप सरनाईक घरी नसताना धाड टाकण्यात कसली मर्दानगी असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांनी विचारलं पाहिजे, एक महिला घरी नसताना…सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं, यात कोणती मर्दानगी होती?,” असं ट्विट प्रवीण दरेकर यांनी केलं आहे.
या छापेमारीवर राजकीय प्रतिक्रिया उमटत असताना भाजप खासदार नारायण राणे यांनी सविस्तर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, मात्र सरनाईक काय साधू संत नाहीत, असा टोला राणेंना लगावला. “कायदेशीर गोष्टींमध्ये चौकशी होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते. ईडी, सीबीआय, कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशा पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचं नसतं. प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत. तुम्ही आधी त्यांची माहिती घ्यावी. ईडीचा छापा पडला, हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा, मग आम्ही प्रतिक्रिया देऊ” असं नारायण राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत, नारायण राणेंचा जोरदार टोला
- वीज बिल माफी न केल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा बावनकुळे यांचा इशारा
- ईडीची ही कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आली, प्रताप सरनाईक यांचा गंभीर आरोप
- 6 वर्षात एकातरी भाजप नेत्याच्या घरावर ईडीने छापा टाकला का ?, काँग्रेसचा सवाल
- तळीरामांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ दिवशी असणार दारू विक्रीस बंदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

