Share

मोदीजी पंतप्रधान असल्यासारखं कधीतरी वागणार आहेत का? ; ‘या’ नेत्याने केला सवाल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – आज लॉकडाऊन च्या ९ व्या दिवशी सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेशी संवाद साधला. १३० कोटी जनतेच्या भारतमातेसाठी, सुदृढतेसाठी, सेवेसाठी २१ दिवसांच्या लॉकडाऊन मधील पुढील दिवसात कटाक्षपणे घरी राहून कोरोनाला एकत्र हरवण्याचे आवाहन केले आहे.

यासोबतच, येत्या रविवारी ५ एप्रिलला जनता कर्फ्यू च्या यशानंतर आता कोरोनाशी लढ्यासाठी कोणालाही एकटं वाटू नये, खंबीर रहावं म्हणून अजून एक मागणी मोदींनी जनतेकडून केली आहे. ती म्हणजे, रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता सर्वांनी ९ मिनिटे लाईट बंद करून दिवा, मेणबत्ती, टॉर्च, मोबाईल फ्लॅशलाईट, इत्यादींनी प्रकाश करून या कोरोनाच्या अंध:काराला दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच यावेळी त्यांनी सुचना देखील केली कि, कोणीही रस्त्यावर न उतरता, सामुहिकपणे न जमता, सोशल डिस्टनसिंग चे पालन करत घराच्या दारातून, बाल्कनीमधून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मोदीजी पंतप्रधान असल्यासारख कधीतरी वागणार आहेत का ? – 

आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोदींच्या या आवाहनावर टीका केली आहे. आपली भूमिका त्यांनी ‘साम टीव्ही न्यूज’ या मराठी वृत्त वाहिनीवर मांडली आहे. ते म्हणाले,

‘कोरोनाच संकट अधिक गंभीर होत आहे. तेव्हा आपले पंतप्रधान आधी टाळ्या वाजवायला सांगितलं, आत्ता दिवे लावायला सांगताय. कधी हे पंतप्रधान असल्यासारखं वागणार आहेत का ? देशाचे प्रमुख म्हणून कधी निर्णय घेणार आहेत का ? एकंदर आज गरज आहे निरनिराळे मेडिकल ईक्वीपमेंट पुरवण, राज्यांना जास्तीत जास्त मदत करण, नागरिकांना धीर देण. हे सोडून दिलं न आता लाईट बंद करून दिवे लावा, टाळ्या वाजवा हे कुठ पंतप्रधानांच काम आहे का ?’ अश्या शब्दात थोरात यांनी मोदींवर टीका केली.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!