औरंगाबाद : औरंगाबाद शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी गंगापुर तालुक्यातील गाजगाव याठिकाणी मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देवुन पाहणी केली. लॉकडाऊनमुळे मोसंबी या फळासाठी बाजार उपलब्ध होत नसून, शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
मोसंबी व इतर भाजीपाल्याला लॉकडाऊनमुळे उठाव नाही, बाजारात उठाव नसल्यामुळे व यात वाहतुक ही बंद असल्यामुळे मोसंबी तसेच पडून आहे. अशी खंत गाजगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याकडे व्यक्त केली.
याप्रसंगी गाजगाव ता. गंगापुर येथील शेतकऱ्याला दिलासा देत आमदार अंबादास दानवे म्हणाले, कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडावुन आहे, त्यात बाजारपेठा सुरु असल्यातरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वाहतुक बंद असल्यामुळे शहरामध्ये आपला पिकवलेला माल बाजारपेठेत आणता येत नाही. त्यामुळे पिक, फळ बागांचे नुकसान पाहण्यात येत आहे.
तसेच संचार बंदीमुळे काही भाजीपाला व फळे सडत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे हे नुकसान भरुन न निघणारे आहे पहिल्यांदा अशी परिस्थती उद्भवली आहे या संदर्भात मी राज्य सरकारकडे मागणी करून लवकरात लवकर शेतमाल खरेदीवरील बंदी उठवून शेतकऱ्यांचे होणारं नुकसान टाळावे यासाठी प्रयत्न करेल असे याप्रसंगी उपस्थित असलेल्या शेतकर्यांना अशी ग्वाही दिली.यावेळी तालुकाप्रमुख राजु वरकड, संपत छाजेड, बाळासाहेब चव्हाण, सुनिल पोल यांची उपस्थिती होती.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

