Share

‘निवडणुकीतून माघार घेत असलो तरी, राजकारण आणि समाजकारणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढेल’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आ. गणपतराव देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर त्यांच्या ऐवजी एका नव्या दमाच्या नेत्याला संधी देणार असल्याचं त्यांनी म्हंटले आहे. निवडणुकीतून जरी निवृत्त होत असलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत राजकारण व समाजकारण करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी देशमुख म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीतच आपण हा निर्णय घेणार होतो. परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणुकीला सामोरे गेलो. चालू वर्षीही कार्यकर्त्यांनी आग्रह केला होता. मात्र त्यांना समजावण्यात आले. असे असले तरी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतून आपण माघार घेतली आहे़. तरीही दुष्काळी सांगोला तालुक्याच्या विकासाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. त्यामुळे राजकारण व समाजकारणातून निवृत्ती घेणार नाही, अशी भूमिका गणपत देशमुख यांनी स्पष्ट केली आहे.

गणपतराव देशमुख यांनी राजकीय वाटचाल

  • 1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली
  • 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश
  • 1999 मध्ये गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश
  • 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारनेही त्यांचा गौरव केला होता.

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते मंडळी पक्षांतर करत आहे. यामुळे भाजप-सेना युतीला ताकद मिळत आहे मात्र आघाडी निवडणुकीच्या तोंडावर खिळखिळीत होत आहे.

कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंना अटक, महाजनादेश यात्रेत करणार होते निदर्शने

सेना – भाजपच्या निष्ठावंत आमदारांना अजित पवारांनी दिली खास ऑफर

चंद्रकांत पाटलांच्या मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणतात…

ठरलं तर मग ! युतीत केवळ 103 जागांवर होणार 50-50 जागावाटप

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!