🕒 1 min read
मुंबई : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिका आहे. या मालिकेमध्ये आता मोठा बदल होणार आहे. सर्वांची लाडकी शनाया आता कायमचीच मालिका सोडण्याचे वृत्त समोर येत आहे. आजपर्यंत या मालिकेत अनेक वेगळी वळणं प्रेक्षकांनी पाहिली आहेत. आता ही मालिका कोणतं नवीन वळण घेणार आहे हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया हे पात्र येत्या काही दिवसातच वगळलं जाणार आहे. सध्या शनाया रेडिओ जॉकी झालेली आहे असं दाखवण्यात आलं आहे. शनायाचा आधीचा बॉयफ्रेंड आर.जे बिंदूराणीला कॉल करतो आणि त्यांची पुन्हा एकदा भेट होते. त्यानंतर शनाया त्याच्यासोबत परदेशी निघून जाते असं चित्र रंगवण्यात येणार आहे. त्यामुळे शनाया अर्थात रसिका सुनीलची मालिकेतून कायमचीच एक्झिट होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी रसिका सुनील ऐवजी इशा केसकर या मालिकेत शनायाची भूमिका साकारताना दिसली होती. रसिकाला खऱ्या आयुष्यात शिक्षणासाठी परदेशी जायचं असल्यामुळे तिच्या जागी इशा केसकरची वर्णी लागली होती. पण आता तिचं पात्रच या मालिकेतून वगळलं जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मालिकेत नक्की कोणता बदल होणार आहे हे अद्यापही समोर आलेले नाही.
महत्वाच्या बातम्या
- यासाठी मी आमदार निलेश लंकेंचा प्रचारक म्हणून काम करणार- अण्णा हजारे
- पंतप्रधान मोदींनी कडेकोट बंदोबस्ताशिवाय गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट
- पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या वेळी थाळीनाद करा, शेतकऱ्यांचे आवाहन
- दुखापतग्रस्थ मोहम्मद शमीच्या जागी लागणार ‘या’ युवा खेळाडूची वर्णी
- आम्ही अधिवेशन घेऊनही पळपुटे मग मोदींना काय म्हणाल?; उदय सामंतांची भाजपवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
