नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीने निवृत्ती घेऊन तासभरही झाला नाही त्यातच मित्र सुरेश रैनाने देखील आपली निवृत्ती जाहीर केलीये.
गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर 15 ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख होती. धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सोशल मिडीयावर शुभेच्छांचा पाऊस पडला.
दरम्यान, आता धोनीला इंग्लडच्या संघाकडून खेळण्याची ऑफर मिळाली आहे.’द हंड्रेड’ लीगच्या लंडन स्पिरिट संघाकडून धोनीला खेळण्यासाठी ऑफर आली आहे. लंडन स्पिरिट संघाचा खेळाडू शेन वॉर्ननं धोनीला खेळण्याची ऑफर दिली आहे. दरवर्षी इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या. या स्पर्धेत आता धोनी खेळणार का, याची उत्सुकता सर्व चाहत्यांना लागून राहिली आहे.
तर दुसऱ्या बाजूला धोनीच्या निवृत्तीनंतर भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी धोनीला २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक लढण्याचा सल्ला दिला आहे. “एम.एस.धोनी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे आणि अन्य कोणत्याही बाबींमधून निवृत्ती घेत नाही. त्यानं जे कौशल्य आणि संघाचं नेतृत्व करण्याची क्षमता क्रिकेटमध्ये दाखवली त्याची सार्वजनिक आयुष्यातही गरज आहे. त्याला २०२४ ची लोकसभा निवडणूक लढायला हवी,” असं स्वामी म्हणाले.
चिंताजनक : कॉंग्रेसच्या आमदारासह कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण
धोनीसाठी फेरवेल सामना आयोजित करा; झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची बीसीसीआयकडे विनंती
बोगस बियाणे प्रकरण; भाजपच्या ‘या’ आमदाराने दिले नवाब मालिकांना ओपन चॅलेंज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

