🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या शहावली खान या गुन्हेगारासोबत जमीन खरेदीचा व्यवहार केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आता यावरच भाजपकडून सडकून टीका केली जात आहे. तर यावरच आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात मुंबईतील अशा किती भूखंडांवर डल्ला मारून बेकायदा आर्थिक व्यवहारांद्वारे जमीनी घशात घालण्यात आल्या, मुंबई लुटण्यात आली त्याची चौकशी करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री ठाकरे देतील का? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे. तसेच हा प्रकार म्हणजे कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या काळ्या कारकिर्दीची कबुली आहे. शाह वली खान या वॉचमनने सातबारावर नाव टाकून हडप केलेली जमीन विकत घेतल्याची कबुली देऊन नवाब मलिक यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळातील एका गंभीर जमीन गैरव्यवहारावर प्रकाश टाकला आहे. या जमीन बळकाव प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
चौकशी करावी. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात मुंबईतील अशा किती भूखंडांवर डल्ला मारून बेकायदा आर्थिक व्यवहारांद्वारे जमीनी घशात घालण्यात आला, मुंबई लुटण्यात आली त्याची चौकशी करण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री ठाकरे देतील का?2/2
— Keshav Upadhye (@keshavupadhye) November 10, 2021
दरम्यान मुंबईच्या एलबीएस रोडवरील २.८ एकर जागेची पॉवर ऑफ अॅटर्नी शहावली खान आणि सलीम पटेल या दोघांकडे होती. त्यांच्याकडून ही साडेतीन कोटींची जागा नवाब मलिक तेव्हा सक्रिय असलेली कंपनी सॉलिडस कंपनीने खरेदी केली,’ असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच, सलीम पटेल हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिचा ड्रायव्हर, फ्रंट मॅन आहे, तो देखील या जमिनीचा पॉवर ऑफ अॅटर्नी होल्डर, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- झीलंडविरुद्ध टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्मा भूषविणार कर्णधारपद
- T20 WC: आज रंगणार उपांत्य फेरी; इंग्लंडपुढे न्यूझीलंडचे आव्हान
- रोहित-द्रविड जोडी टीम इंडियाला नव्या शिखरावर नेईल- रवी शास्त्री
- अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग; फडणवीसांनी दिले पुरावे
- न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ‘या’ दिग्गज खेळाडूंना ठेवले संघाबाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

