Share

पालघर प्रकरणावरून राम कदम पुन्हा आक्रमक, जनआक्रोश यात्रा काढून करणार सरकारचा निषेध

Published On: 

मुंबई : भाजप नेते राम कदम यांनी नुकतेच पालघर गडचिंचले हत्याकांड प्रकरणी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र या यात्रेसाठी घराबाहेर पडताच राम कदम यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं . राम कदम निवासस्थानापासून या यात्रेला सुरुवात करणार होते. यासाठी पोलिसांना तैनात करण्यात आले होते. मात्र राम कदम समर्थकांसोबत पालघरच्या दिशेने निघण्यासाठी बाहेर येताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

राम कदम आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतल्यानंतर हा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु असून दुर्दैवी असल्याचं राम कदम म्हणाले होते. पालघर हत्याकांडाला 211 दिवस होऊन देखील अजून कारवाई आली नाही. याच्या निषेधार्थ ही यात्रा कदम यांनी काढली होती. शिवाय हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी देखील त्यांनी केली होती.

दरम्यान,आता पालघर प्रकरणावरून आमदार राम कदम पुन्हा एकदा आक्रमक झाले असल्याचे चित्र आहे. पालघर प्रकरणाची कोणत्याही प्रकारची चौकशी न झाल्याच्या निषेधार्थ कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं आहे. राम कदम यांच्या निवासस्थानापासून यात्रेला सुरुवात होणार आहे.

आम्ही हातात दिवे घेऊन पालघरला जाणार आहोत. याआधी आमची जनयात्रा या सरकारने मध्येच थांबवली होती आणि अटक केली. हे सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पालघर हत्याकांडाला २११ दिवस होऊनही अद्याप कारवाई न करण्यात आल्याच्या निषेधार्थ ही यात्रा काढण्यात येणार होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!