Share

सूर्या तू थांबू नकोस… निवड न झाल्यानंतर सचिनने दिला होता खास सल्ला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात आपली निवड झाली नसल्याचं कळाल्यावर सूर्यकुमार यादव निराश झाला होता. चांगली कामगिरी ही केवळ  IPL मधली नसून, गेल्या ३ वर्षात हा खेळाडू मुंबई इंडियन्स कडून खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी करत आलेला आहे.

चांगल्या  कामगिरीनंतरही सूर्यकुमारला भारतीय संघात स्थान न मिळणं हे सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी आश्चर्यकारक ठरलं होतं. सूर्यकुमारही खूप चिंताग्रस्त झाला होता. पण त्याचवेळी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने त्याला फोन करुन प्रोत्साहन दिलं. याबाबत खुद्द सूर्यकुमारने माहिती दिली आहे.

मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवने यंदाच्या आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. याशिवाय स्थानिक क्रिकेटमध्येही त्यांनं चांगल्या धावा कुटल्या होत्या. तरीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या ३२ जणांच्या संभाव्य संघात त्याची निवड होऊ शकली नाही.

‘जर तू खेळाप्रती प्रामाणिक आणि सच्चा आहेस, तर नक्कीच एकदिवस खेळही तुझा विचार करेल. कदाचित तुझ्या मार्गातला हा शेवटचा अडथळा असेल. भारतीय संघाकडून खेळण्याचे तुझे स्वप्न अजूनही एका कोपऱ्यात दडून आहे. लक्ष्य केंद्रीत कर आणि स्वत:ला क्रिकेटच्या स्वाधीन कर’, असा संदेश सचिनने निराश झालेल्या सूर्यकुमार यादवला दिला.

‘मला माहित्येय की तू निराश होऊन प्रयत्न सोडून देणाऱ्यांपैकी नाहीस. प्रयत्न करत राहा आणि आम्हाला तुझ्या दमदार खेळी पाहण्याचा, सेलिब्रेट करण्याचा आनंद देत राहा’, असंही सचिनने सांगितल्याचं खुद्द सूर्यकुमारने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

आपल्या कामगिरीत सातत्य दाखवून देखील यादवला गेली २ वर्षे भारतीय संघात स्थान मिळू शकलेले नाही. काहीच्या मते कोत्या स्वभावाचे काही मंडळी यादवला टीम इंडियात जागा मिळू देत नसल्याची चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!