Share

IND vs BAN | तिसऱ्या वनडेसाठी के. एल. राहुल करणार टीम इंडियाचे नेतृत्व, तर ‘हे’ गोलंदाज संघातून बाहेर 

Published On: 

🕒 1 min read

IND vs BAN | टीम महाराष्ट्र देशा: बांगलादेशविरुद्ध (IND vs BAN ) सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी बीसीसीआय (BCCI) ने टीम इंडियामध्ये काही बदल केले आहेत. कारण भारतीय संघातील काही खेळाडू दुखापतीमुळे या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), वेगवान गोलंदाज दीपक चहर (Dipak Chahar) आणि कुलदीप सेन (Kuldeep Sen) दुखापतीमुळे तिसरा एकदिवसीय सामना खेळू शकणार नाही. तर, कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या गोलंदाजाचा भारतीय संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. तिसरा एकदिवसीय सामन्यामध्ये कुलदीप यादवला खेळण्याची संधी दिली आहे.

बीसीसीआयने नुकतीच रोहित शर्माच्या दुखापतीबाबत अपडेट दिली आहे. बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माला दुखापत झाली होती. या दुखापतीमध्ये त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला इजा पोहोचली होती. अशा परिस्थितीत रोहित फलंदाजीसाठी मैदानावर आला होता. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, रोहितची बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने तपासणी केली आहे. त्याचबरोबर ढाका येथील स्थानिक रुग्णालयात त्याचे स्कॅनिंग करण्यात आले होते. दरम्यान, तज्ञांनी त्याला मायदेशी रवाना होण्याचा सल्ला दिला आहे. अशा परिस्थितीत रोहित मुंबईसाठी रवाना झालेला असून तिसऱ्या एक दिवसीय सामन्याला त्याला मुकावे लागणार आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर वेगवान गोलंदाज कुलदीप सिंहने पाठीत जड आल्याची तक्रार केली होती. वैद्यकीय तपासणीनंतर कुलदीपला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापासूनच विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. दरम्यान, कुलदीपसेन देखील या मालिकेतून बाहेर पडला आहे. तर, वेगवान गोलंदाज दीपक चहरला दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात डाव्या हाताला दुखापत झाली होती. दुखापतीनंतर दीपक देखील या मालिकेतून बाहेर पडला होता. भारतीय संघातील दोन गोलंदाजांना दुखापतीमुळे बाहेर पडावे लागल्यामुळे बीसीसीआयने कुलदीप यादवचा संघात समावेश केला आहे.

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या एक दिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघ नवीन कर्णधारासह मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये के एल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. के एल राहुलने आतापर्यंत 6 एकदिवसीय 1, टी-20, आणि 1 कसोटी सामन्याचे नेतृत्व केलेले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!