Share

‘फक्त साखर कारखान्यांसाठीच २५ किलोमीटर हवाई अंतराची अट का?’, शेतकरी संघटनेचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

बीड : साखर कारखान्यातील भ्रष्टाचार व अकार्यक्षमता संपवण्यासाठी दोन साखर कारखान्यांतील २५ किलोमीटर हवाई अंतराची अट रद्द करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे येत्या शनिवारी (दि. ३०) दुपारी १२ वाजता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्या उपस्थितीत ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी सांगितले की, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेशात १० टक्के रिकव्हरीसाठी प्रतिटन ३५०० रुपये(एसएपी) सरकारी निर्धारित किंमत असतानाही महाराष्ट्रातील साखरसम्राटांनी रिकव्हरी चोरी, काटामारी करून शेतकऱ्यांना एफआरपी वाजवी आणि किफायतशीर किमतीभोवताली गुंतवून ठेवले आहे.

महाराष्ट्रात दोन सिमेंट कारखाने, दोन कापड गिरण्या, दोन सोयाबीन तेलाचे कारखाने, दोन पेट्रोल किंवा डिझेल कारखाने, दोन मोटारसायकलींचे कारखाने, दोन लोखंडी सळयांचे कारखाने, दोन ट्रकचे कारखाने यासाठी कुठेही अंतराची अट नाही. मग साखर कारखान्यांसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट का, यावर ऊस परिषदेत चर्चा होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!