Share

परप्रांतीय प्रवाशांवर निर्बंध नाहीत, मग लोकलने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांवरच निर्बंध का?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले निर्बंध काही जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. मात्र, राज्य सरकारने मुंबईकरांची यावेळी पण निराशा केली. लोकल प्रवासाला घालून दिलेले नियम कायम ठेवण्यात आले आहेत. आता जनजीवन पूर्वपदावर येत असून कोरोना स्थिती देखील आटोक्यात येत आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना मिळावी अशी मागणी मागील महिनाभरापासून जोर धरू लागली आहे.

मुंबईत जरी लोकल प्रवासावर निर्बंध असले तरी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आणि देशाच्या कोणत्याही राज्यातून प्रवासी रेल्वेनं मुंबईत दाखल होऊ शकतात. अशा सर्व प्रवाशांची रेल्वेस्थानकांवर चाचणी करणं बंधनकारक आहे. मात्र गेले काही दिवस या चाचण्या होत नाहीत. त्यामुळे त्यांना covid-19 ची लागण झाली आहे की, नाही हे देखील समजू शकत नाही. तरीही या परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध महाराष्ट्र सरकारनं आणलेले नाहीत.

दुसरीकडे मुंबईत आणि आसपासच्या महानगरांमध्ये लाखो नागरिकांचे लसीकरण झालेले आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकलनं प्रवास करु द्या, असं टास्क फोर्सनं देखील सांगितलं आहे. मात्र तरीही सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमध्ये जाण्यावर बंदीच आहे. हा दुजाभाव सरकार का करतंय? असा सवाल उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी विचारला आहे. बाहेरून येणाऱ्या सर्व प्रवाशांना कोणत्याही निर्बंधांशिवाय प्रवास केला जाऊ शकतो. तर आम्हाला देखील लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी सर्वसामान्य प्रवासी करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!