Share

शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी करा, आ.चव्हाण यांनी घेतली केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडांची भेट!

Published On: 

औरंगाबाद : उच्च शिक्षण घेण्यासाठी विविध बँकांमध्ये शैक्षणिक कर्जाचे व्याजदर हे ९ ते १३ टक्के याप्रमाणे आहेत. जे की सर्व सामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नाहीत. त्यामुळे शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी करावेत अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी आज (दि. ४) अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची दिल्ली येथे भेट घेतली. केंद्र सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आ.सतीश चव्हाण यांनी आज भागवत कराड यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी करण्यासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी भागवत कराड यांच्याशी सविस्तर चर्चा करून लेखी निवेदन दिले. गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे शिक्षणाची अनेक दालने खुली झाली आहेत.

पर्यायाने शिक्षणासाठी लागणारा खर्च देखील सर्व सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. उच्च शिक्षण घेण्यासाठी विविध बँकामध्ये शैक्षणिक कर्ज मिळते. मात्र वेगवेगळ्या बँकांमध्ये शैक्षणिक कर्जाचे व्याजदर हे ९ ते १३ टक्के याप्रमाणे आहेत. जे की सर्व सामान्य विद्यार्थ्यांना परवडणारे नाही. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील अनेक होतकरु, हुशार विद्यार्थ्यांनी कर्ज काढून उच्च शिक्षण पूर्ण केले मात्र अपुर्‍या संधीमुळे त्यांना अद्यापही नोकरी मिळालेली नाही.

गृह कर्ज, वाहन कर्ज हे ५ टक्के व्याजदराप्रमाणे मिळते. त्याच प्रमाणे शैक्षणिक कर्ज देखील याच व्याजदराप्रमाणे मिळायला हवे. शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी केल्यास गरजू, होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे सोयीचे होईल. जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी बँकांना इष्टांक देण्यात यावे, पाच लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज घेणार्‍या विद्यार्थ्यांना विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक आयोजित केली जाईल असे भागवत कराड यांनी आश्वस्त केले असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी सांगितले. याप्रसंगी अमरसिंह पंडित यांची देखील उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!