मुंबई : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हतबल होऊन अनेकांनी आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आले. तसेच पुण्यात भाजी विक्रीत्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. कोरोना निर्बंधांचा निषेध करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न भाजी विक्रित्याने केला अशी माहिती समोर येत आहे. ही घटना बुधवारी घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी त्या भाजी विक्रीत्याला ताब्यात घेतले.
यावर, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. सोशल मिडीयावर पोस्ट टाकत भातखळकर म्हणाले, ‘कोरोनाच्या नावाखाली कडक निर्बंध लादून सामान्य जनतेवर विशेषत: हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब कष्टकऱ्यांवर महाविकास आघाडी सरकारने उपासमारीची वेळ आणली आहे. पुण्यातील भाजी विक्रेत्याने या निर्बंधांच्या विरोधात केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर तरी खंडणी सरकारचे डोळे उघडावेत.’ असे ते म्हणले.
दरम्यान, कोरोनाच्या काळात महारष्ट्रात अनेक आत्महत्या प्रकरणे समोर आली. त्यात सर्वाधिक रोजमजूर होते. औरंगाबादेत देखील रिक्षाचालकाने बँकेचे हप्ते लॉकडाऊन मुळे थकल्या कारणाने आत्महत्या केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘नशाबंदी मंडळाचे ५४ लाखांचे प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करा’
- ‘इच्छा माझी पुरी करा’ ; पतीच्या निधनानंतर पंढरपूरच्या विठूरायाला पत्नीकडून 1 कोटींचे दान
- १०२ व्या घटनेची केंद्राने केली दुरुस्ती; आता चव्हाण म्हणतात, मराठा आरक्षणासाठी ‘हे’ देखील करा
- शिवाजीनगर भुयारी मार्ग : खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांची भेट
- शैक्षणिक कर्जावरील व्याजदर कमी करा, आ.चव्हाण यांनी घेतली केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडांची भेट!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

