Share

पडळकरांवरच कारवाई का? दरेकरांचा सवाल

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्या १३ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या सोहळ्याला छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे, होळकर घराण्याचे १६ वे वंशज यशवंतराव होळकर, बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरचे आमदार संजय जगताप, तसंच महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

शरद पवारांच्या हस्ते या पुतळयाच उद्घाटन होण्याआधीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन केलं

पण पडळकर यांना हे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढू शकतात. अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण प्रकरणी जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. जेजुरी पोलिस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन व पोलीस कामात अडथळा यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी या सर्व घटनाक्रमावर भाष्य केले आहे. त्यांनी पडळकर यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला आहे. इतरांनी अनधिकृतरित्या केलेल्या उद्घाटनावर कारवाई नाही, मग पडळकरांवरच कारवाई का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ‘कायदा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. मात्र, आमच्यावर तत्काळ गुन्हा दाखल केला’, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!