Share

आजपासून 2000 रुपयांचं डिस्काऊंटसह खरेदी करा रीअलमीचा ‘हा’ नवीन स्मार्टफोन

Published On: 

मुंबई : चीनी वस्तूंच्या वापराचे प्रमाण मर्यादित झाले असले तरी देखील कमी किंमतीतील स्मार्टफोन घेण्यासाठी लोक चीनची स्मार्टफोन मेकर कंपनी चे फोन घेणे पसंत करतात त्यामुळे चीनी वस्तूंचा वापर जारी कमी करणायत आला आला तरी देखील स्मार्टफोन याला अपवाद आहे. आता देखील अशाच एका चीनी स्मार्टफोन मेकर कंपनी भारतात आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. रीअलमी X7 हे या स्मार्टफोनचे नाव आहे.

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आजपासून या फोनची पहिली विक्री सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी भारतात लॉन्च झालेला हा 5 जी स्मार्टफोन आहे. या फोनला दोन व्हेरिएंटमध्ये देण्यात आला आहे. याची किंमत 19,999 रुपये आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रीअलमी X7 हा 5 जी कनेक्टिव्हिटी असलेला स्मार्टफोन सर्वसामान्यांनाही परवडणारा आहे. हा फोन क्वाड रियर कॅमेर्यासह देण्यात आला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये देण्यात आला आहे. यात पहिल्या व्हेरिएंटमध्ये 6 जीबी रॅम आहे, ज्याची किंमत 19,999 रुपये आहे. तर दुसरा व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह आहे, ज्याची किंमत 21,999 रुपये आहे. या फोनचा सेल रियलमीच्या ऑफिशियल स्टोअर, फ्लिपकार्ट आणि इतर काही ठिकाणावरून दुपारी 12 वाजल्यापासून खरेदी करता येणार आहे. आय सीआयसीआय बँकेचं कार्ड वापरत असाल तर यावर तुम्हाला फ्लॅट 2,000 रुपयांच डिस्काऊंट देण्यात आलं आहे. इतकंच नाहीतर Axis बँकेच्या कार्डवरही 1,500 रुपयांचा ऑफ देण्यात आला आहे. यामध्ये EMI सेवाही उपलब्ध असणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये सुपर AMOLED फुल HD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो मिडिया टेक डायमेन्सिटी 800U प्रोसेसरसह येतो. यामध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आला आहे. तसेच फोटोग्राफीसाठी यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच या फोनमध्ये 50W सुपरडार्ट चार्जिंग सपोर्टसह 4310mAh क्षमतेची बॅटरी दिली जाईल. रियलमी X7 या फोनमध्ये तुम्हाला 6.55 इंचांचा सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज स्पेस दिली जाईल. ही मेमरी मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवता येईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!