🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्ती संदर्भात दिलेली माहिती तसेच रश्मी ठाकरे यांच्या जमीन खरेदीबाबत उपलब्ध झालेली कागदपत्रे पाहता ठाकरे कुटुंबाचा व्यवसाय जमीन खरेदीचा की इमारती बांधण्याचा आहे असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलं आहे.
सोमैया यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबाबत दिलेल्या माहितीची कागदपत्रे सादर केली. किरीट सोमैया म्हणाले की, आदित्य ठाकरे हे ३१ मार्च २०२० पर्यंत हिबिस्कस फूड एलएलपी, एलिओरा सोलर एलएलपी या कंपन्यांचे डेझिग्नेटेड पार्टनर होते असे दिसते आहे.
मंत्री बनल्यावर जवळपास ४ महिने ते एखाद्या कंपनीचे संचालक म्हणून कसे राहू शकतात? कंपनीचा डेझिग्नेटेड पार्टनर हे पद लाभाचे (ऑफिस ऑफ प्रॉफिट) नाही का? याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे असं त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा करत किरिट सोमय्या यांनी खळबळ उडवून दिली आहे होती.
उद्धवजी ठाकरें पत्नी सौ रश्मी ठाकरे यांच्या करजत येथील जमीनी निवडणूक एफिडेविट मधे लपवल्या आहेत का?
श्री आदित्य ठाकरे ठाण्याचे प्रसिद्ध अजय आशर बिल्डर बरोबर पार्टनरशिप
मंत्री झाल्या त्यानंतरही दोन कंपनीचे मॅनेजिंग पार्टनर, ऑफिस ऑफ प्रॉफिटचा भंग @BJP4Maharashtra@Dev_Fadnavis pic.twitter.com/VdRlnocWr8
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 19, 2020
या जमिनीचा उल्लेख करताना एकाच सर्व्हे क्रमांकाच्या जमिनीचा उल्लेख दोन वेळा करण्यात आला आहे. हा प्रकार संशयास्पद आहे. मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात ठाकरे परिवार व अन्वय मधुकर नाईक परिवारासोबत ३० जमीन खरेदी करार झालेले दिसत आहेत.
या सर्व व्यवहारांच्या सात बारा उताऱ्यांवर ‘सदर जमीन लागवडीस अयोग्य” असं स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या व्यवहारांवरून काही प्रश्न उपस्थित होत आहेत त्यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्पष्टीकरण द्यावे, अशी महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे असं किरीट सोमैया म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण !
- ‘…तर भाजपने पब्लिक राड्यात सामील व्हावं’; भाजपच्या समर्थनावर नांदगावकरांची प्रतिक्रिया
- ‘आता पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही’
- ‘भाजपच्या अकार्यक्षमतेमुळे महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली’
- राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

