🕒 1 min read
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. अनेक महिने घरात बसलेले मुख्यमंत्री राज्याने कधी पाहिले नव्हते. बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारे आहे.
इतर राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीतून जनतेचे पाठबळ भाजपाच्या पाठिशी असल्याचे सिध्द झाले आहे. बिहार निवडणुकीच्या यशानंतर भाजपमधील सर्वाची जबाबदारी वाढली आहे. आगामी निवडणुका लक्षात घेवून आत्मनिर्भर योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यत पोहचवा.
राज्यात लवकरच भाजपची सत्ता येईल. शिर्डी नगरपंचायतीवरही भाजपचाच झेंडा फडकविण्यासाठी कटीबध्द व्हा, असा संदेश माजी मंत्री भाजपचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
शिर्डी शहरातील भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र आमदार विखे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आ.विखे पाटील पुढे म्हणाले की, कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या यशस्वी उपाय योजनांमुळे भारतात मृत्यूचा दर कमी राहिला.
देशवासीयांना दिलासा देण्यासाठी आत्मनिर्भर योजनेच्या माध्यमातून पथविक्रेते आणि उद्योजकांपर्यत सर्वानाच उभारी देण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या माणसांपर्यत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. तसेच कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाकडे जगाचे लक्ष वेधले गेले.
आगामी काळात शिर्डी नगरपंचायतीची असलेली निवडणूक लक्षात घेवून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नियोजन सुरू करावे, थोड्याच दिवसात राज्यात भाजपची सत्ता येईल आणि नगरपंचायतीवरही भाजपा झेंडा फडकेल, असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, पक्षाच्या उद्योग आघाडीच्या उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख शिवाजी गोंदकर, शिर्डी शहराचे अध्यक्ष सचिन शिंदे, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण !
- ‘…तर भाजपने पब्लिक राड्यात सामील व्हावं’; भाजपच्या समर्थनावर नांदगावकरांची प्रतिक्रिया
- ‘आता पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही’
- ‘भाजपच्या अकार्यक्षमतेमुळे महावितरणची थकबाकी 37 हजार कोटींनी वाढली’
- ‘काँग्रेसकडे असणाऱ्या खात्यांना निधी तर नाहीच पण इज्जत सुद्धा दिली जात नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

