Share

आरोपींचा बचाव करण्याचा मविआ सरकारचा अट्टाहास का ? फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही दिवसांपूर्वी मेळघाटच्या हरिसाल येथील वनक्षेत्राच्या वनाधिकारी दीपाली चव्हाण यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यांचे वरिष्ठ विनोद शिवकुमार यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आपले जीवन संपविले होते. यापार्श्वभुमीवर मेळघाट वनक्षेत्राचे माजी प्रादेशिक संचालक एमएस रेड्डी यांना शासनाने निलंबित केले आहे.

दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरील निलंबन कारवाई पुरेशी नसून त्यांना या प्रकरणात सहआरोपी करावे व त्यांची विभागीय चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीने केली आहे.

याप्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य करत महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘अवघ्या 28 वर्षांच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची केवळ बदली होते. आंदोलनं झाल्यानंतरच अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते. खरे तर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

यासोबतच, ‘प्रत्येक विषयांमध्ये आंदोलन करावे लागत आहे. त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का? असा संतप्त सवाल देखील फडणवीसांनी केला आहे.

यासोबतच, दीपाली चव्हाण प्रकरणात चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करून जलदगती न्यायालयात खटला चालवाव आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी,’ अशी मागणी देखील फडणवीसांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!