कोल्हापूर : देशातील सर्वच टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर आता पुणे-बेंगलुरू महामार्गावरील टोल वसुलीमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. १ एप्रिल पासून या महामार्गावरील टोलमध्ये 5% वाढ करण्यात आली आहे. पुणे-सातारा दरम्यानच्या आणेवाडी आणि खेड शिवापूर या टोलनाक्यांवरील टोल दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
यामुळे, वाहनधारकांना अधिकचा फटका बसणार आहे. तर, या टप्प्यातील महामार्गाची अवस्था ही दयनीय असून गेल्या दहा वर्षांपासून महामार्ग रुंदीकरणाचे काम रखडले आहे. यामुळे, वाहनचालकांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असून अपघटनाचे प्रमाण देखील वाढत आहे. अशा स्थितीतही टोल दारात वाढ केल्याने आता संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील टोलधाडीवर संताप व्यक्त केला आहे. ‘कागल ते बेळगाव प्रवासात कोगनोळी टोलनाक्यावर कार व जीपसाठी टोल आकार ७५ रूपये आहे. पुणे ते कागल महामार्गावर कामे अपूर्ण तरी खेड शिवापूर टोल नाक्यावर कार व जीपसाठी टोल आकार ९५ वरून १०० रूपये करण्यात आला आहे.’
मात्र पुणे ते सातारा मर्सिडीजने प्रवास केल्यास ट्रॅक्टरने प्रवास केल्यासारखे वाटते.सातारा ते पुणे हा रस्ता रिलायन्सने केला आहे व टोलही रिलायन्सच वसूल करते. इतके लाढ कशासाठी
रिलायन्स जिंदाबाद
“करलो दुनिया मुठ्ठी मे” @reliancegroup @NHAI_Official @nitin_gadkari @ANI @PMOIndia— Raju Shetti (@rajushetti) April 2, 2021
पुढे ते म्हणतात, ‘कागल ते बेळगाव जीपने प्रवास केल्यास मर्सिडीजने प्रवास केल्यासारखे वाटते. मात्र पुणे ते सातारा मर्सिडीजने प्रवास केल्यास ट्रॅक्टरने प्रवास केल्यासारखे वाटते. पुणे ते सातारा हा रस्ता रिलायन्सने केला आहे व टोलही रिलायन्सच वसूल करते. इतके लाड कशासाठी रिलायन्स जिंदाबाद “करलो दुनिया मुठ्ठी मे” ‘ अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात मिनी लॉकडाऊन जाहीर, पण दहावी-बारावीसह MPSC परीक्षा होणा
- पुण्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन, दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी…
- ‘ “आधारवड” पवारांचा हॉस्पिटलमध्ये मुक्काम, तरीही त्यांची देशासह राज्यातील घडामोडींवर बारीक नजर’
- ‘प्रिय EC, माजरा क्या है ?’ भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम सापडल्यानंतर प्रियांका गांधींचा सवाल
- Breaking : पुण्यात लॉकडाऊन नाहीच, मात्र ‘हे’ असणार कडक निर्बंध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

