Share

‘ईडीची चौकशी फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांचीच का ?’ अंबादास दानवेंचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचे नेते आक्रमक झाले आहेत. शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रशासन आणि भाजप सरकार ही कूटनीती खेळत असून,ईडी च्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न भाजप नेते करीत आहे, असं दानवे म्हणाले आहेत.

सत्तेचा वापर करून शासकीय यंत्रणाचा दुरुपयोग केंद्र शासन आणि भाजप करत असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केला असून, नारायण राणे यांच्यावर भाजपने या अगोदर आरोप केले होते, मात्र नारायण राणे भाजपात आल्यानंतर आता ईडीची चौकशी त्यांची करण्यात आली नाही. यासंदर्भात भाजपकडे उत्तर आहे का, असा प्रश्न दानवेंनी उपस्थित केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस मंत्री नवाब मलिक यांच्यावर आरोप करतात आणि ईडी लगेच चौकशी करून अटक करते. हा लोकशाहीचा खून नाही का, असा सवाल शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केंद्र शासनाला केला आहे. केंद्रात सत्ता असल्याने शासकीय यंत्रणाचा भाजप सरकार गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळी आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!