मुंबई : नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना आपला आक्रमक बाणा दाखवला आहे. यावेळी पत्रकारांनी शर्जिल उस्मानी प्रकरणी नाना पटोले यांना प्रश्न विचारला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले कि, “शर्जिल उस्मानी वर कारवाई व्होवी हीच कॉंग्रेसची भूमिका आहे. क्कॉन्ग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. शर्जिल उस्मानी वर कारवाई होईलच पण रामजादे हरामजादे, अली बजरंग बली असे म्हणणाऱ्यांवर केंद्र सरकारने कारवाई करावी अशी देखी आमची मागणी आहे.” असे ते म्हणाले.
एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात प्रदीप गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम १५३ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्याच्या राजकारणात नाना पटोले यांच्या प्रवेशांनंतर मोठा बदल होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान नाना पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर राज्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकावर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अशातच त्यांनी राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शिवजयंतीवरील निर्बंधांचं उदयनराजेंनी केलं समर्थन !
- ईव्हीएम वरून अजितदादा आणि नाना पटोलेंमध्ये मतभेद; खुद्द पटोलेंनी दिली कबुली
- राज्यात कॉंग्रेसला क्रमांक एकचा पक्ष बनविण्याचा पटोलेंचा दावा खरा ठरेल का ?
- शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकारचे निर्बंध ! वाचा कशी आहे नियमावली
- आणि कार्यकारी संचालकांनी राजिनामा दिला… चर्चेला उधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

