Share

का केला जातो ५ सप्टेंबर ला शिक्षक दिन साजरा

Published On: 

गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु …
गुरुर देवो महेश वरा …
गुरुर साक्ष्यात परब्रम्ह …
तस्मय श्री गुरुवे नमः …

वेबटीम : भावी पिढी समर्थ आणि सक्षम बनविणाऱ्या शिक्षकांबद्दल विद्यार्थांचा मनात नेहमीच आदर असतो. भारतात सर्वात पहिला शिक्षक दिन साजरा झाला तो १९६२ मध्ये निमित्त होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसाचे. विद्यार्थांच्या मनात नेहमी डॉ. राधाकृष्णन याचं स्थान होतो.
डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या कर्तृत्त्वाच्या बळावर भारताचे राष्ट्रपतीपद भुषविले. त्यांच्या विद्यार्थांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले. तेव्हापासून ५ सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आई-वडिलांनंतर आपल्याला घडविण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा आपल्या शिक्षकांचा असतो. त्यामुळे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा गौरव आणि आपल्या आयुष्यातील शिक्षकांचे स्थान लक्षात रहावे यासाठी डॉ. राधाकृष्णन यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शाळांमध्ये शिक्षक दिन खास प्रकारे साजरा केला जातो. विद्यार्थी शिक्षक होतात, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे ह्या आठवणी आयुष्यभर स्मरणात राहतात.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी…

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्र प्रदेशातील तीरुत्तानी या गावी झाला. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. डॉ.राधाकृष्णन यांनी आंध्र विद्यापीठ आणि बनारस हिंदू विद्यापीठ यांचे कुलगुरू पद भूषविले. नंतर १९३१ ते १९३९ ही वर्षे त्यांनी राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व केले. १९४९ ते १९५२ मध्ये रशियातील राजदूत म्हणून त्यांची भारत सरकारने नियुक्ती केली होती. त्या देशातही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला. १९५२ मध्ये ते भारतात परतले, त्यानंतर १९५२ ते १९६२ या कालावधीत त्यांनी देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषविले. भारताचे दुसरे राष्ट्रपती होण्याचा मान त्यांना मिळाला. १९५४ साली भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताबही बहाल केला होता. १७ एप्रिल १९७५ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!