Share

‘करुणा शर्मांविरुद्ध कटकारस्थान ; एखादा मंत्रीच जर अन्याय, अत्याचार करत असेल तर…’

Published On: 

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या, अनेकांचा भांडाफोडसाठी येत असल्याचे जाहीर करणाऱ्या, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा शर्मा रविवारी परळीत दाखल झाल्या. दरम्यान, त्यांच्यावरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. आज त्यांना अंबाजोगाई कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान या सर्व घटनेवर आता भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष रित्या गंभीर आरोप केले आहेत. ‘परळीत आलेल्या करुणा शर्मा यांच्याबाबतीत जे काही घडले, त्यावरून त्यांच्याविरूद्ध कटकारस्थान रचल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारे जर राज्यातील एखाद्या मंत्र्याकडूनच कोणावर अन्याय करण्याची भूमिका दिसून येत असेल तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रसारमाध्यमांतून घटनेच्यावेळचे जे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यावरून हे मोठे कारस्थान असल्याचे दिसते,’ असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.

तसेच ‘करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल सापडणे हा सुद्धा एक कटच आहे. एवढा मोठा जमाव असताना, चालू गाडीत एक जण डिक्की उघडत आहे, हातातील वस्तू ठेवली जाते. दुसरा या बाजूचा माणूस डिक्की बंद करतो. त्याच्यासाठी शेजारी पोलिस उभा राहिलेला असतो. या सर्व गोष्टी पाहिल्या तर हा मोठा कट असल्याचे दिसून येते आहे. हे कायद्याचे राज्य आहे. यामध्ये सर्व प्रक्रिया त्याच मार्गाने झाल्या पाहिजेत. कोणावरही अन्याय होता कामा नये. मंत्र्यांनी जी शपथ घेतली आहे, ती स्मरणात ठेवून न्याय झाला पाहिजे.’ अशी स्पष्ट भुमका आज शिंदे यमी मांडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!