मुंबई : हरियाणामधील स्थानिक आणि पंचायतीच्या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपच्यावतीन करनालमध्ये राज्य पातळीवरील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि इतर भाजप नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांनी झालेल्या बैठकीचा विरोध करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आक्रमक शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग 44 वर बसतांडा टोल नाक्यावर नाकाबंदी केली होती. यावेळी शेतकऱ्यांनी टोल ब्लाझा येथे चक्का-जमा करत आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. पोलीस शेतकऱ्यांची समजूत काढायला गेले तेव्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाल्याचं दिसून आले.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी ट्वीटरच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत जेष्ठ अभिनेत्या आणि खासदार हेमालीनी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘निवडणुकांत शेती करणारी खासदार हेमा मालिनी जी शेतकऱ्यांचं समर्थन करताना का दिसत नाहीये?’ असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
निवडणुकांत शेती करणारी खासदार हेमा मालिनी जी शेतकऱ्यांचं समर्थन करताना का दिसत नाहीये???
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) September 1, 2021
हेमा मालिनी या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मथुरेतील भाजपच्या उमेदवार होत्या त्यावेळी हेमा मालिनी यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. हेमा मालिनी या निवडणुकीच्या प्रचारासाठी मथुरामध्ये हेलिकॉप्टरने गेल्या होत्या त्यांनतर त्यांनी तिथे शेतामध्ये काम देखील केले त्यांचे यावेळचे फोटो देखील ट्विटर आणि फेसबुकवर जोरदार व्हायरल झाले होते. यानंतर मात्र हेमा मालिनी यांच्यावर जोरदार टीका झाली होती. तसेच नव्या कृषी कायद्यांविरोधात चालू असलेल्या आंदोलनावर देखील त्या गप्प राहिलेल्या दिसल्या. याचाच आधार घेत भाई जगताप यांनी हेमा मालिनी यांच्यावर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लोकांच्या जिवापेक्षा आपला अजेंडा मोठा मानू नये’, गृहमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष सल्ला
- दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- रिलायन्स जिओचे खास प्लॅन्स; Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन मिळणार मोफत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

