Share

सोन्याचे आमिष दाखवत एक लाख चाळीस हजार रुपयांना फसवले

Published On: 

परभणी: वेगवेगळ्या प्रकारे आमिष दाखवून लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. अशीच एक घटना परभणी येथे घडली. बाबूराव काटवे यांना वारंवार फोन करून आमिष दाखवणाऱ्यानी कटावे यांना तब्बल १ लाख ४० हजार रुपयांना लुटले आहे. फोन केलेल्या भामट्याने परभणीतून बोलतोय असे सांगून सहा-सात किलो सोन्याचा हंडा सापडला आहे. त्यापैकी एक किलो सोने जर तुम्ही विकून दिले तर तुम्हाला ५० ग्रॅम सोने दिले जाईल असे आमिष दाखवले.

या आमिषाला बळी पडत काटवे यांनी सलग १५ दिवस भामट्यांच्या संपर्कात होते. पंधरा मार्च रोजी सकाळी चारचाकी वाहनाने परभणीकडे निघाले, तेव्हा वाटेतच आरोपींनी फोन करून लोहा येथे येण्यास सांगितले. त्यामुळे काटवे व त्यांच्यासोबतचे इतर काही जण लोहा येथे जाण्यासाठी निघाले. लोहा येथे पोहोचल्यानंतर १६ मार्च रोजी पहाटे ३.४५ च्या सुमारास आरोपींनी त्यांना गंगाखेडच्या पुढे येण्यास सांगितले.

त्यानुसार, काटवे हे दत्तवाडी शिवारात पोहोचले. त्यावेळी दोन पुरुष व दोन महिला त्या ठिकाणी उभ्या होत्या. काटवे हे गाडीतून खाली उतरताच एका महिलेने त्यांना बनावट सोने दाखविले. हे सोने बनावट असल्याने काटवे यांनी घेण्यास नकार दिला व ते गाडीत बसण्यासाठी निघाले. त्याचवेळी इतर दोघांनी त्यांना पकडून मारहाण केली. गाडीची झडती घेऊन १ लाख ४० हजार रुपये आरोपींनी काढून घेतले.याप्रकरणी बाबुराव काटवे यांच्या फिर्यादीवरुन सोनपेठ पोलीस ठाण्यात १ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!