मुंबई : केदारने आपल्या इन्टाग्रामवर क्रिकेटच्या पीचवर लावलेल्या स्टम्पसमोर नारळ फोडताना स्वत:चा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने पुण्यामध्ये क्रिकेट अकादमी सुरु केल्याची माहिती दिलीय. केदार जाधव क्रिकेट अकादमी असं या अकादमीचं नाव असणार आहे. “ही एका भन्नाट प्रवासाची सुरुवात आहे.
एखाद्या खेळाडूला यशस्वी होण्यासाठी सराव आणि प्रशिक्षण या गोष्टी फार महत्वाच्या असतात. उदयोन्मुख क्रिकेटपटुंना सर्वोत्तम सेवा पुरवण्याचं माझं स्वप्न या अकादमीच्या माध्यमातून आज सत्यात अवतरलं आहे. या अकादमीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
https://www.instagram.com/p/CMZkEHdL_Yf/?utm_source=ig_web_copy_link
आपल्या क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याची इच्छा असणाऱ्यांची यशोगाथा लिहिण्यासाठी केदार जाधव क्रिकेट अकादमी सज्ज आहे,” असा मजकुर केदारने या फोटोसोबत शेअर केलाय. केदारच्या या अकादामीच्या उद्घाटन प्रसंगी त्याचे कुटुंबियही उपस्थित होते. या पोस्टच्या माध्यमातून केदारने क्रिकेट शिकू इच्छिणाऱ्या त्याच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. या अकादमीच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये करियर घडवू इच्छिणाऱ्यांना खास करुन पुण्यातील तरुणांना चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- चौथा सामना जिंकण्यासाठी भारताला कराव्या लागतील ‘या’ चार गोष्टी
- नांदेड जिल्ह्यात कर्जबाजारी झालेल्या दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
- परभणीकरांनी महानगरपालिकेचे थकवले ९३ कोटी; करवसुलीसाठी मनपा आक्रमक
- इशान किशनच्या फलंदाजी क्रमवारीत बदल केल्याने संजय मांजरेकरांची टिका
- युवराजची बॅट पुन्हा तळपली; पुन्हा केली षटकांराची बरसात


