औरंंगाबाद : वाहनचोरट्यांनी शहर परिसरात धुमाकुळ घातला असून चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून तीन दुचाकी लंपास केल्या आहेत. सय्यद शहा अजहर उल हक कादरी (वय ३७, रा.तोटी की मस्जिदजवळ, चेलीपुरा) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीआर-८०६५) चोरट्याने ५ मार्च रोजी सायंकाळी चार ते सहा वाजेच्या दरम्यान घराजवळून चोरून नेली.
गारखेडा परिसरात राहणा-या तक्रारदार महिलेची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीजी-७३१८) चोरट्याने १ पेâब्रुवारीच्या रात्री डि-मार्ट जवळून चोरून नेली. सिडको परिसरात राहणाNया तक्रारदार महिलेची,
दुचाकी क्रमांक (एमएच-२०-ईडब्ल्यू-६९६३) चोरट्याने १६ मार्च रोजी चिकलठाणा परिसरातील ओपो मोबाईल शॉपी समोरून चोरून नेली. विविध भागातून दुचाकी वाहने लंपास करणा-या चोरट्याविरूध्द सिटीचौक, जवाहनगर आणि एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- चौथा सामना जिंकण्यासाठी भारताला कराव्या लागतील ‘या’ चार गोष्टी
- नांदेड जिल्ह्यात कर्जबाजारी झालेल्या दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
- परभणीकरांनी महानगरपालिकेचे थकवले ९३ कोटी; करवसुलीसाठी मनपा आक्रमक
- इशान किशनच्या फलंदाजी क्रमवारीत बदल केल्याने संजय मांजरेकरांची टिका
- युवराजची बॅट पुन्हा तळपली; पुन्हा केली षटकांराची बरसात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

