Share

झोमॅटो प्रकरणातील हितेशाने सोडले बंगळुरू पोलिसांनी सांगितलं ‘हे’ कारण 

Published On: 

बंगळुरू : झोमॅटो डिलिव्हरी बॉयला मारहाण केल्याप्रकरणी तसेच खोटा बनाव केल्याबाबत बंगळुरूमधील हितेशा चंद्राणी या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता या महिलेने बंगळुरू सोडलं असल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर हितेशाच्या घराचा पत्ता व्हायरल झाल्याने सुरक्षेच्या कारणामुळं हा निर्णय घेतला आहे. याबाबत बंगळुरू इलेक्ट्रॉनिक सिटी पोलीस ठाण्याचे पोलीस अनिल कुमार म्हणाले, की जेव्हा आम्ही तिच्या घरी गेलो, तेव्हा कोणीच दरवाजा उघडला नाही. एका दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, की हितेशाला बंगळुरूमध्ये राहाण्याची भीती वाटत होती. लोक एफआयआरबद्दल विचारपूस करण्यासाठी तिच्या घरी येऊ शकत होते. त्यामुळे तिने बंगळुरू सोडल्याचे सांगितले जाता आहे.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही व्हिडीओ शेअर होत आहेत, यात हितेशाच्या बंगळुरूमधील घराचा पत्ता सांगितला आहे. बंगळुरुतील हितेशा चंद्राणी या महिलेनं ऑर्डर उशिरा आल्याच्या वादातून झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने आपल्याला मारहाण केली असा दावा केला होता.

या महिलेनं रक्तबंबाळ अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी डिलिव्हरी बॉय कामराजला अटक केली, परंतु अटक केल्यानंतर त्याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. हितेशानेच आपल्याला मारहाण केल्याच त्याने सांगितले. ‘खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे चंद्राणी यांच्या घरी पोहचण्यास उशीर झाला. त्यानंतर हितेशा यांनी जेवण ताब्यात घेतलं, पण आपण कस्टमर सपोर्टशी बोलत असल्याचं सांगून पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर हितेशा अचानक जोरात ओरडायला आणि शिव्या द्यायला लागली. आणि मला मारायला लागली त्यातच त्यांचा हातातील अंगठी त्यांना लागल्याने त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागेल.’ असा अनुभव कामराजने सांगितला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!