नंदूरबार : कोरोनामुळे नंदूरबार जिल्ह्यात संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पण अनेक ठिकाणी नागरिक नियमांचे उल्लंघन करून गर्दी करत आहेत. यातच रमजानचा महिना सुरू असल्याने मुस्लीम समाजातील नागरिक नमाज पठणासाठी मस्जिदमध्ये जात आहेत. यामुळे गर्दी होऊन कोरोना पसरण्याची भीती आहे. हा धोका लक्षात घेऊन मशिदीत गर्दी करू नका, असे सांगत नमाज पठण रोखल्यावरुन दोन मुस्लीम जमावात चांगलाच वाद झाला.
यावेळी लोखंडी रॉड, लाकडी दांडे, हॉकी स्टिकने एकमेकांवर हल्ला केल्याने ६ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी २१ जणांविरुध्द गुन्हा दाखल करून १२ आरोपींना अटक केलीय. ही घटना नंदुरबार शहरातील चिराग अली मशिद समोर घडली. पोलिसांच्या माहितीनूसार, चिराग अली मशिद समोर ८ मे रोजी रात्री नमाज पठण करण्यासाठी मुस्लीम समाजातील नागरिकांनी गर्दी केली होती. त्यावेळी आवाहन ‘गर्दी करू नका, फक्त ५ लोकांना परवानगी आहे’ असे आवाहन करण्यात आले. पण नमाज पठण करण्यापासून जमावाला रोखल्याच्या एक जमाव हा दुसऱ्या जमावावर धावून गेला.
‘तुने हमको नमाज के लिये मशिद में आनेसे क्यु रोका?’ असे म्हणत जमावाने शेख आबिद शेख जैनोदिन, शेख आसिफ शेख जैनोदिन यांना मारहाण केली. याप्रकरणी मोहम्मद आबिद शेख जैनोदिन यांच्या फिर्यादीवरून चिराग गल्लीतील १२ जणांसह जमावा विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच त्या सर्व १२ जणांना अटक करण्यात आलीये.
तर दुसऱ्या गटाच्या फिर्यादीनूसार नमाज पठणावरून तसेच चिराग अली मशिदीच्या मालकीच्या घराच्या भाड्यावरून वाद झाला. तेव्हा जमाव चालून आला आणि त्यांनी काठ्या, लोंखडी अँगल, लोखंडी पाईप यांचा वापर केला. तसेच शिवीगाळ करत फिर्यादी व त्याचा पुतण्या शाहीदवर हल्ला केला. तसेच घरात घसून घरातील सामानाचे व घराजवळ दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या वाहनाचे नुकसान केले. या मारहाणीत सलीम शेख गुलाम रसूल, साहिद शेख सलीम शेख, फरिद शेख गुलाम रसुल हे जखमी झाले. फरीद शेख गुलाम रसुल यांच्या फिर्यादीवरून गल्लीतील ९ जणांसह जमावाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदींकडून कौतुक, पण दरेकरांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडले’, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल
- ‘मोदींनी राज्यपालांना कार्यमुक्त करून मंत्रीपद द्यावे’, नवाब मलिकांचा टोला
- आता ‘या’ मोठ्या शहरात १२ मे पासून पूर्ण लॉकडाऊन !
- ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकरना टोल माफी, केंद्राचा निर्णय
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे

