🕒 1 min read
मुंबई – ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर यांनी Insiderसाठी घेतलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक स्फोटक खुलासे केले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत अहमदनगरमधील भाजपचे तत्कालीन खासदार दिलीप गांधी याना डावलून सुजय विखे याना उमेदवारी का देण्यात आली याबाबत मोठा खुलासा केला आहे.
अहमदनगरमधील भाजपचे तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांचं काम चांगलं होतं. त्यांनी मेहनतही भरपूर केली. पण आम्ही जे सर्वेक्षण केलं त्यात अँटी इन्कम्बन्सी आढळली. त्यामुळे आपण काही बदल करावं, असा आमचा विचार होता. अहमदनगरमध्ये उमेदवारीसाठी काही नावे होती. ती नावे असताना राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या मुलाने लोकसभेसाठी जवळपास चार वर्षे मेहनत घेतली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली’, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
दिलीप गांधी हे व्यक्ती चांगले आहेत, त्यांनी कामंही केली आहेत. पण तरीही इन्कम्बन्सी दिसली. त्यामुळे आम्ही बदल केला. याचा अर्थ दिलीप गांधी राजकारणात संपले असं नाही. उद्या गांधी तुम्हा पु्न्हा दुसऱ्या कुठल्या पदावरती दिसतील. गांधी पुढे कदाचित आमदार, खासदार, विधान परिषद किंवा राज्यसभेत दिसू शकतील’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, याच मुलाखतीमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येऊ शकतात का? या प्रश्नावर मात्र त्यांनी थेट उत्तर दिलं नाही. राज ठाकरे यांच्यासोबत व्यक्तिगत मैत्री आहे. त्यांचा मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा आम्हाला मान्य आहे. मात्र परप्रांतियांबाबतची त्यांची टोकाची भूमिका मान्य नाही. त्यांनी टोकाची भूमिका सोडली तर वगळं घडू शकते. मात्र हा प्रश्न राज ठाकरे यांनाच विचारा असंही फडणवीस म्हणाले.
संजय राऊत म्हणजे ‘नेमेचि येतो पावसाळा’, दरेकरांची राऊतांवर खरमरीत टीका
बोगस बियाणे विकणार्या महाबीजवर कारवाई करा – देवेंद्र फडणवीस
नाभिक समाजाचे प्रश्न शासनाकडे मांडणार : देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

