🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा स्थगित केली.आता ही उर्वरीत स्पर्धा लवकर सुरु होणार नसल्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू आपल्या घरी परतले आहेत.
घरी परतल्यांनंतर खेळाडू कसा आपला वेळ घालवत आहेत. असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. त्यामध्ये धोनीचे चाहते नेहमी त्याला पाहायला उत्सुक असतात. धोनी सोशल मीडियापासून दूर असला तरी त्याची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. साक्षी नेहमी धोनी आणि मुलीचे व्हिडीओ शेअर करत असते.
https://www.instagram.com/p/CPYQasRHPBD/?utm_source=ig_web_copy_link
साक्षीने नुकताच धोनीचा एक दुर्मिळ जुना फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. साक्षीने शेअर केलेला हा फोटो 2009 सालचा आहे. या फोटोत धोनी लहान मुलांसोबत क्रिकेट खेळताना दिसतोय. फोटोतील मुलगा बॅटींग करत असून धोनी स्टंपच्या मागे उभे राहत विकेट किपिंग करत आहे. हा फोटो शेअर करत साक्षीनं, ‘तुम्ही सर्व मोठे का झाला?’ असा प्रश्न विचारला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- लॉकडाऊनमुळे रोजगार गेला, हप्ते भरायला पैसे नाही; शेवटी गळफास लाऊन केली आत्महत्या!
- इंग्लंड दौऱ्याआधी जडेजाने शेअर केला धोनीसोबतचा जुना फोटो; आठवणीला दिला उजाळा
- बीडमध्ये ७०३ नवे रुग्ण तर ८८७ रुग्ण कोरोनामुक्त!
- …तर काँग्रेसला योग्य तो विचार करावाच लागेल, नितीन राऊत आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
