🕒 1 min read
मुंबई : सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित करण्यात आला. या मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबत भाष्य केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाबाबत विचारण्यात आले होते का? यावर उध्दव ठाकरे म्हणाले, मी अगदी शेवटच्या काळातही त्यांना विचारले होते की, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का? त्यांनी नीट सांगितले असते तर, गेलो असतो आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला जाऊन सांगितल असतं की माझी लोकं तुमच्यासोबत काही आनंदाने राहायला तयार नाहीत. पण त्यांच्यात तेवढी हिंमत नव्हती, त्यांच्याकडे काही कारणेच नव्हती, रोज वेगळी कारणे देत आहेत, असे उध्दव ठाकरे म्हणाले.
काँग्रेस धोका देणार आणि पवारसाहेबांवर तर अजिबातच विश्वास ठेवता येणार नाही, असं मला सातत्याने असे भासवलं जात होतं. तेच तुम्हाला पाडतील असे सगळे सांगायचे. अजित पवारांबद्दलही माझ्याकडे येऊन बोलायचे. पण माझ्याच माणसांनी विश्वासघात केला. मग सभागृहात एका जरी माणसाने माझ्याविरोधात मत दिलं असतं तर ते माझ्यासाठी लज्जास्पद होत, असेही उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले.
मी मुख्यमंत्री झालो, आता मी होऊन गेलेला आहे, पण प्रॉब्लेम काय तुम्हाला? ज्या बाळासाहेबांचा फोटो लावताय त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवलं? इतकी अडीच वर्ष किंवा त्याच्या आधी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्याची क्लिप वायरल होत आहे. तेव्हा भाजप कसा अत्याचार करतो आहे हे सांगत राजीनामा दिला होता, ही क्लिप आहे, माझ्या समोर त्यांनी राजीनामा दिला होता आणि ते स्वतः बोलत आहेत, असे म्हणत उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrakant khaire | बंडखोर आमदारांनी बाळासाहेबांचा शेवटचा आदेश का पळाला नाही – चंद्रकांत खैरे
- Sandipan Bhumre : उद्धव ठाकरे यांच्या वागणुकीमुळे शिवसेना संपली – संदीपान भूमरे
- Uddhav Thackeray : एकनाथ शिंदेंनी भाजपवर आरोप करत राजीनामा दिला होता, माझ्याकडे क्लिप आहे – उद्धव ठाकरे
- CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केला ‘असा’ उल्लेख!
- Udhdav Thackeray : फडणवीस उपमुख्यमंत्री आणि शिंदे मुख्यमंत्री या डावपेचांवर उध्दव ठाकरेंचे भाष्य; म्हणाले…!


