Share

कोरियोग्राफर रेमो डिसूजाच्या मेव्हण्याने केली आत्महत्या? बहिण लिजेलने केला धक्कादायक खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरियोग्राफर रेमो डिसूजा (Remo D’souza) याचा मेव्हणा(brother in law) जैसन वाटकिंसन (Jason Watkins) मुंबईत (Mumbai) राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. त्याच्या टोकाच्या निर्णयाने रेमो डिसूजा व लिजेल यांच्यावर शोककळा पसरली आहे.

जैसन वाटकिंसन (Jason Watkins) याने राहत्या घरी आत्महत्या (suicide) केल्याने एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर जैसनची बहीण आणि रेमो डिसूजाची पत्नी लिजेल (Lizelle D’souza) हिने इन्स्टास्टोरीवर भावाच्या फोटोंसोबत इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. का? तू माझ्यासोबत असं कसं करू शकतोस? मी तुला कधीच माफ करणार नाही…, असं पहिल्या पोस्टमध्ये लिजेलने लिहिलं आहे. तसेच दुसऱ्या एका पोस्टमध्ये लिजेलने भाऊ जैसन आणि आईचा फोटो शेअर केला आहे. यात जैसन त्याच्या आईसोबत ऑटोत बसलेला दिसतोय. या फोटोसोबत लिजेलने लिहिलेलं कॅप्शनही भावुक करणारं आहे. ‘आई मला माफ कर… मी तुला निराश केलं…,’ असं लिजेलने लिहिलं आहे. यामुळे सर्वत्र त्याबद्दल हळहळ केलं जात आहे.

जैसनच्या आत्महत्यनेनंतर त्याने का आत्महत्या केली? याविष्ययी लिजेलने धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितलं, तीन वर्षांपूर्वी माझ्या आईचं निधन झालं होतं. आईच्या निधनाने माझा भाऊ जैसनला मोठा मानसिक धक्का बसला होता. आईच्या निधनानंतर त्याची मानसिक स्थिती बिघडली होती. यामुळे त्याने लग्नदेखील केलं नाही. तो माझ्या आईच्या सर्वात जवळ होता, आईच्या जाण्याने तो पूर्णपणे नैराश्यात गेला होता. याच दरम्यान त्याला गांज्याचं व्यसन जडलं होतं. त्याने याच नशेत आत्महत्या केली असावा, अशी शक्यताही लिजेलने व्यक्त केली.

भावाच्या मृत्यूची बातमी मिळाली, तेव्हा रेमो व लिजेल गोव्यात (Goa)एका लग्नसोहळ्यासाठी गेले होते. जैसन हा फिल्म इंडस्ट्री अनेक वषार्पासून काम करत होता. रेमो डिसूझा यांच्या सर्व प्रोजेक्टमध्ये तो असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम पाहायचा. मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असून आत्महत्येचं कारण स्पष्ट झाले नाही. त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या: 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!