Share

भीक का मागताय ? ठाकरे सरकारवर निलेश राणेंची जहरी टीका

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातून दीड ते पावणे दोन लाख कोटी रुपये महसूल केंद्राला जातो. दोन वर्षांसाठी हा कर माफ केला, तर माझे अख्खे राज्य कर्जातून बाहेर पडू शकते. नुसते सगळे मिळतेय म्हणून द्यायचे काही नाही. केंद्राने महाराष्ट्राला साह्य केले पाहिजे, सहकार्य केले पाहिजे. असे विधन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले. आता याच मुद्द्यावरून भाजपचे आमदार निलेश राणे यांनी ट्वीट करत खोचक टीका केली आहे.

” काय पोरकट मुख्यमंत्री आहे. राज्यातून जो महसूल जातो तो केंद्र सरकार परत वेगवेगळ्या मार्गाने राज्यातच पाठवतात. मागायचेच असेल तर महाराष्ट्र ज्या प्रमाणात महसूल पाठवतो त्याच प्रमाणात राज्यात परत आला पाहिजे ही मागणी करा. भीक का मागताय ? असे ट्वीट करत निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी मागणी केली आहे. “राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं मदत करायला हवी. विरोधी पक्षातील नेत्यांनीही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी. राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आर्थिक साहाय्य करण्याची मागणी त्यांनी करावी,” असंही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉलही केला होता, असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं.

दरम्यान, शिवसेना आणि राणे कुटुंबियाचा वाद संपूर्ण राज्याला माहित आहे. अशातच ठाकरे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर नितेश राणे यांनीदेखील सरकारला धारेवर धरण्याचे संकेत दिले. होते. कालच नितेश राणे यांनी ट्वीट करत ठाकरे सरकावर निशाणा साधला होता. तर आज नितेश राणे यांचे बंधू निलेश राणे यांच्या या ट्वीटमधून सरकारला धारेवर धरण्यास सुरवात झाल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!